पुणे : येथील कल्याणीनगरमध्ये रविवारी (ता. 19) रोजी मोठ्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्शे गाडी चालवत दोघांना उडवले होते. या अपघात प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी सातवी अटक केली आहे. या प्रकरणात विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.
विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांनाही गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्यातील अपघात प्रकरणात ही सातवी अटक आहे. चालकाला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आधी पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली होती. तसेच विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी झाली होती.
सुरेंद्र अग्रवाल हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. छोटा राजनशी संबंध असल्याच आणि त्यातून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा खटला देखील सुरु आहे. या प्रकरणात ज्या वेळी अपघात घडला त्यावेळी अल्पवयीन मुलाच्या शेजारी ड्रायव्हर बसला होता गंगाराम पुजारी याला सुरेंद्र कुमारने डांबून ठेवले आणि योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला आहे.
सुरेंद्र कुमार अग्रवालला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार आहेत.