Pune Prime News : “हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरूर” असे म्हणत ८० वर्षाच्या वडिलांना कोर्टात एकटे जावु देणार नाही. असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. त्या सध्या त्यांच्या मतदार संघांच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी गावात गावकऱ्यांची संवाद साधला.
न्यायालयीन लढाईमुळे मतदार संघासाठी वेळ देता येत नसल्याची कबुली दिली. मतदार संघातील कामाचा अर्धा वेळ हा केसा लढण्यात जात आहे. नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की आता 11 महिने टाटा बाय-बाय, मला फक्त टीव्हीवरच बघा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या, वकिलांबरोबर आता राहायची सवय झालीय. बरेच दिवस वकील नाही भेटले तर कसं तरी वाटतं. दोन्ही गटातील वकिल हे माझे मित्र आहेत, त्यामुळे मी चहा एका बरोबर घेते आणि जेवण एका बरोबर करते. त्यामुळे लोक म्हणतात की हे काय चाललंय, पण मी त्यांना प्रेमाने म्हणते आपली दोस्ती एका बाजूला आणि लढाई एका बाजूला. त्या गटाचे वकिल शरद पवारांना भेटले की त्यांना सॉरी म्हणतात. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.
एकटा माणूस काय करणार?
“एकटा माणूस काय करणार? सर्व जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे आता ऑक्टोबरपर्यंत वेळ नाही. मतदार संघ बघायचा? कामे बघायची, की कोर्टाच्या केसेस? पवार साहेब स्वतः जातात मात्र जनाची नाही मनाची तरी आहे. 80 वर्षाच्या वडिलांना एकटे कोर्टात जाऊ देणार नाही..असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, कोर्टाची पायरी आता चढलोय उतरायची नाही. जेव्हा आपण खरे असतो तेव्हा लढायची, निकालाची भीती वाटत नाही. कारण आपण खरे आहोत. असे म्हणत आता न्यायालयीन लढा लढताना मजा यायला लागली आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.