सासवड, (पुणे) : Supriya Sule – अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सासवड- जेजुरी रस्त्यावर महिला मोटार सायकल वरून चक्कर येऊन चालू गाडीवरून पडली. महिलेच्या डोक्याला मार लागला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जखमी महिलेला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात पोलिस गाडीतून पाठवले. त्यांच्या या कार्याचे सध्या परिसरात कौतुक केले जात आहे. (Supriya Sule)
खासदार सुप्रिया सुळे या पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर
मिळालेल्या महितीनुसार, खासदार सुप्रिया सुळे या पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सासवड- जेजुरी रस्त्यावऋण त्यांचा ताफा निघाला असताना अचानकपणे रस्त्यावर महिला मोटार सायकल वरून चक्कर येऊन चालू गाडीवरून पडली. या प्रसंगी त्यांना मदतीची गरज असताना रस्त्याने ये-जा करणारे नुसते पाहून पुढे निघून जात होते. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. महिलेच्या डोक्याला मार लागला. हि गोष्ट तात्काळ त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदर त्यांचा ताफा थांबवला.
यावेळी अपघात झालेल्या महिलेची विचारपूस केली तसेच पुढील उपचारासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पोलीसांच्या गाडीत बसवून पाठविले. तसेच त्या ठिकाणी असलेले आरोग्य अधिकारी सोनावणे यांच्याशी चर्चा करून सदर महिलेच्या उपचाराबाबत चर्चा केल्या. अपघातग्रस्ताला खासदार सुळे यांनी तत्काळ मदत उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे १९० आमदार तर ३६ खासदार निवडून येतील – खासदार सुप्रिया सुळे