Supriya Sule | हिंजवडी : रिहे ग्रामस्थांनी गावातील एका प्लॉटमध्ये काही नागरिकांनी गुंतवणूक करून सोसायटी तयार केली आहे. आपल्या स्वप्नातल्या घराची नोंदणी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनदेखील मुळशी तालुक्यातील गटविकास अधिकारी नोंदणी होऊ देत नाहीत.
त्यामुळे ही नोंदणी रखडलेली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. त्यावेळी माझ्या बारामती लोकसभा मतदार संघात कुणीही दादागिरी केलेली मी खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.माण येथे माण पंचायत समिती गणाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी त्या बोलत होत्या.
सुळे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना तात्काळ या संबंधी तंबी दिली. यासह येथील नियमात होणार्या कामांना रोखणार्या अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा त्रास होत असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी पुनवळे, ताथवडे, जांबे, नेरे, कासारसाई, हिंजवडी येथील नागरिकांनी महामार्ग क्रमांक 4 च्या बाबत विविध मागण्या केल्या. पुनवळे येथील रास्ता, उड्डाणपूलाबातची मागणी केली. त्याबाबत संबंधित अधिकार्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, सभापती पांडुरंग ओझरकर, सागर साखरे, सुरेश हुलावळे, बाबाजी शेळके, गणपत जगताप आदी उपस्थित होते.
माण ग्रामपंचायतच्या पदाधिकार्यांनी या वेळी सांगितले, की माण गावातील सुमारे 68 टक्के जमीन एमआयडीसीने संपादित केली आहे. मात्र, आयटी पार्कला हिंजवडी असा सर्रास उल्लेख केला जातो. हा स्थनिक नागरिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक, हॉटेल चालक आणि इतर संस्था असा उल्लेख करतात.
या वेळी सुळे म्हणाल्या, की यापुढे फेज 1 साठी हिंजवडी तर फेज 2 व फेज 3 साठी माण असा उल्लेख करणे स्पोईस्कर ठरेल. यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार घ्यावा. संबंधित आस्थापणास पत्र द्यावे वेळ आल्यास जिल्हाधिकार्यांनादेखील याबाबत निवेदन द्यावे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!