पुणे : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावरून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे की, व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले. त्याबद्दल मोदींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी. राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे’, असे त्या म्हणाल्या.
चंद्रपूर येथे पंतप्रधान मोदींची प्रचारसभा झाली. यामध्येच मुनगंटीवार यांनी विधान केले होते. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या, ‘डिसेंबरपासून जवळपास मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. हे शेतकरी अडचणीत आहे. मजूर अडचणीत आहे, हे सातत्याने बोलत आहे. माझ्या मतदारसंघात उजनीत एक थेंब पाणी नाही. नाझरेमध्ये एक थेंब पाणी नाही. संपूर्ण महाराष्ट्रात 35 टक्के पाणी शिल्लक आहे, पुरेल की नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. हे ट्रिपल इंजिन खोके सरकार अतिशय असंवेदनशील आहे. प्रचारात व्यस्त आहे. त्यांना दुष्काळाचं काही घेणेदेणे नाही, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
तसेच पंतप्रधान मोदी मंचावर असताना असं गलिच्छ वक्तव्य करणं योग्य नाही. मोदी यांचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे. मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.