बारामती: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिका-यांना नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रम बारामतीत पार पडला. यावेळी सुप्रिया सुळेंनी कॉंग्रेसवासीय हिमंता शर्मा यांना मुख्यमंत्री केल्यावरून भाजपवर टीका केली.
हिमंता शर्मा थेट मुख्यमंत्री
आसामचे मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांचे उदाहरण देत त्या म्हणाल्या, आयुष्य कॉंग्रेसमध्ये काढले आणि काल भाजपमध्ये सहभागी होऊन थेट मुख्यमंत्री बनले. ज्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलल्या, लाठ्या खाल्ल्या, आंदोलन केले, त्यांना बाजूला सारुन एका कॉंग्रेसवासियाला भाजपने थेट मुख्यमंत्री केले, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
विरोधात होते तेव्हाही भाजपचे नेते विरोधात आणि सत्तेत येऊनही बाहेरच्या पक्षातून आलेले सत्तेवर बसल्याने मूळ भाजपवासिय उपेक्षितच राहिले, अशा शह्दात त्यांनी भाजपटी अंदरकी बात सर्वांससमोर मांडली.
माझी सेटींग नाही
मी बोलत नाही याचा अर्थ माझ सेटींग आहे, असे अजिबात नाही, अनेकदा आरे ला कारे म्हणायला फार ताकद लागत नाही, पण अरे म्हटल्यावर गप्प बसून सहन करायला खूप ताकद लागते. त्यामुळे कमी बोला, आपली लढाई इथल्यांशी नाहीच आहे, अदृश्य शक्ती मराठी माणसाच्या विरोधात आहे, त्यामुळे त्यांच्याशी आपली लढाई आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या…
• सत्तेत आल्यावर सत्तेचा गैरवापर कधीच करणार नाही.
• वैचारिक लढाई वैयक्तिक कोणाशीच लढाई नाही.
• राष्ट्रवादीच्या चांगल्या कामात भाजपने मिठाचा खडा टाकला.
कॉंग्रेसमुक्तीची भाषा करणा-यांनी कॉंग्रेसवासियांना सामावून घेतले.
• भाजपने सगळ्याच मर्यादा सोडून दिल्या आहेत.
• सर्वाना दडपशाहीने भीती दाखवायचे सुरु आहे.
• महिलांचा मानसन्मान न करणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख.
• बेरोजगारीचा प्रश्न राज्यात गंभीर बनला आहे.
• पी.एचडी. झालेल्या व्यक्तीला 27 हजार रुपये पगार मिळतो हे दुर्देव.