बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय, असं विधान करत पवार कुटुंबाचे मनोमिलनाचे संकेत दिले होते. यावर खा. सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, पवार कुटुंबाबाबत माझ्या मनात मनभेद, मतभेद कधीच नव्हते. कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत व समाजातील जबाबदाऱ्या उंबरठ्याच्या बाहेर, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, असे वक्तव्य केले होते. तसेच आमदार संजय गायकवाड यांनी हजार, दोन हजार रुपयांत तुम्ही विकले गेलात. यावर सुळे यांनी ‘राम कृष्ण हरी’ अशी प्रतिक्रिया दिली. अद्याप पालकमंत्र्यांचा तिढा सुटला नसून, मी अनेक वर्ष सत्ता जवळून पाहिली आहे. मात्र पालकमंत्री पदावरून एवढी रस्सीखेच कधीही पाहिली नाही. पालकमंत्री पदात काय गुढ आहे, हे मला समजले नाही, असे सुळे म्हणाल्या.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुळे म्हणाल्या, याचे उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. आता दिल्लीत होत असलेल्या निवडणुकांबाबत खा. सुळे यांनी अरविंद केजरीवाल यांना अनेक मतदार कुठून आले आहेत, हेही माहीत नाही. याची यादीच त्यांनी सादर असून, निवडणूक आयोगाला आमची एवढीच विनंती आहे की, पारदर्शकपणे निवडणूक पार पाडाव्यात.