पुरंदर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज पुरंदर दौरा केला. सुनेत्रा पवार यांनी या दौऱ्यादरम्यान पुरंदरचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट घेतली. जाधवराव यांची भेटी दरम्यान दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भोर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची घेतली होती भेट, त्यानंतर आता पुरंदर दौऱ्यावर असताना घेतली दादा जाधवराव यांची भेट घेतली.