सासवड : दिवे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन रमेश टिळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शोभा राजेंद्र लडकत यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी सरपंच योगेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सुमन टिळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य अमित झेंडे, गुलाब झेंडे, रुपेश राऊत, शोभा जगदाळे, श्रद्धा पोमण, भारती आढाळगे, शोभा टिळेकर, शोभा झेंडे आदी उपस्थित होते. या निवडीनंतर भाजपाचे नेते बाबाराजे जाधवराव, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुनम झेंडे, वंदना खटाटे, निलेश ताकवले, गणपत शितकल, ग्रामसेवक काशीपती सुतार, शेतकरी बांधव, महिला, युवक, नागरिक पत्रकार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुमन टिळेकर म्हणाल्या, गावच्या विकास कामावर भर देणार आहे. गावातील समस्या सोडवून महिलांच्यासाठी काम करणार. महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे अडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणार आहे.