पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून प्रशासनात मोठे बदल करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच 58 आयपीएस आणि सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर आता पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुहास दिवसे हे याआधी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी कार्यरत होते. आता त्यांच्या जागी डॉ. राजेश देशमुख हे क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.