Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘यशवंत’च्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या हिताला महत्त्व देणारी मंडळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांचा हल्लाबोल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 3 March 2024, 19:16
sudarshan chaudhari criticized shetkari vikas aghadi panel in

लोणी काळभोर: शेतकऱ्यांचे हित पाहण्याऐवजी व्यापाऱ्यांच्या हिताला महत्त्व देणारी मंडळी विरोधी पॅनेलमधून ‘यशवंत’च्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. गेल्या दहा महिन्यांत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कोणतेही प्रभावी काम न करता, बाजार समितीमध्ये होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करून यांनी कायम शेतकरी विरोधी धोरण अवलंबले आहे. आता हीच मंडळी शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून आम्ही कारखाना सुरू करू शकतो, अशी वल्गना करत  आहेत. मुळात ही शेतकरी विकास आघाडी नसून व्यापारी विकास आघाडी आहे, असा घणाघात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी केला आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी सोरतापवाडी येथे प्रचार करताना झालेल्या कोपरा सभेत शेतकरी सभासदांना मार्गदर्शन करताना सुदर्शन चौधरी बोलत होते. यावेळी  पॅनल प्रमुख माधव काळभोर, दिलीप काळभोर, सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, महादेव कांचन, सुभाष काळभोर, विलास काळभोर, सोपान कांचन, राजेंद्र टिळेकर, तुकाराम पवार, राजेंद्र खांदवे, रघुनाथ चौधरी, प्रवीण कामठे, बाबासाहेब काकडे, मारुती कुंजीर व उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुदर्शन चौधरी पुढे म्हणाले, यशवंत कारखाना सुरु करू शकतील, अशी सक्षम मंडळी रयत सहकार पॅनलमध्ये आहे. ज्येष्ठ नेते माधव काळभोर, सभापती दिलीप काळभोर, सुरेश घुले, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वातील रयत सहकार पॅनलबरोबर आम्ही भक्कमपणे उभे आहोत. राजीव घुले पाटील यांचे स्वतःचे दोन कारखाने आहेत व आज रयत पॅनलच्या माध्यमातून उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. त्यांच्या अनुभवाचा यशवंत सुरु करण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

 

‘यशवंत’ सुरु करण्यासाठी राज्य सरकारची मदत लागणार आहे. सर्वपक्षीय अशा रयत सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. भाजपचे रोहिदास उंद्रे, संदीप भोंडवे, रवींद्र कंद, तालुकाध्यक्ष श्यामराव गावडे, अजिंक्य कांचन, नवनाथ काकडे, कमलेश काळभोर अशी सर्व मंडळी रयत सहकार पॅनलसोबत आहे. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्यामार्फत भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कारखाना सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असंही चौधरी यांनी म्हटले आहे.

सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे १७० कोटी रुपये ठेव भाग भांडवल शिल्लक आहे. पुण्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. त्यातच बाजार समिती जर शहरात राहिली तर तिचे  राष्ट्रीयकरण होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात पुण्याचा मुख्य बाजार जर थेऊर येथील जागेत हलवला तर शेतकऱ्यांच्या दोन्ही संस्था एकाच ठिकाणी होतील. बाजार समितीच्या माध्यमातून कारखाना उभा करण्यासाठी आर्थिक मदत करता येईल, असा प्रस्ताव रयत सहकार पॅनलच्या नेते मंडळींना आम्ही दिला आहे. तालुक्याच्या दोन्ही शेतकरी संस्था एकाच ठिकाणी आल्याने शेतकऱ्यांची सोय होईल.

तसेच माझे आजोबा भाई के. डी. चौधरी कारखान्याचे संचालक व उपाध्यक्ष होते. त्याचबरोबर माझे वडील जयप्रकाश चौधरी व चुलते अरविंद चौधरी हे संचालक होते. मी स्वतः सभासद असून यशवंत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अथक प्रयत्न केले. व्यापारी विकास आघाडीच्या नेते मंडळींना जनता त्यांची जागा दाखवणार हे नक्की. मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी सभासदांना कळकळीची विनंती करतो की, यशवंत सुरु करू शकतील अशा सामर्थ्यवान रयत सहकार पॅनलच्या ‘किटली’ या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहनही सुदर्शन चौधरी यांनी केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27
Next Post
Prakash Jagtap criticized rayat sahkar panel in Yashwant Cooperative Sugar Factory election

मतदारांनो जागे व्हा, 'यशवंत'ची एक इंचही जागा शिल्लक ठेवण्यासाठी नव्हे, तर विरोधी गट विकून खाण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात; बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांचा घणाघाती आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.