गणेश सुळ
केडगाव : शिष्यवृत्ती परीक्षा या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षेंचा पाया मनाला जातो. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडूच या लहान वयापासूनच मिळत असते. याच बाबींचा विचार करून पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी राज्यात विविध परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील देलवडी (ता. दौंड) येथील रयत शिक्षण संस्थेचे जय मल्हार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी (एन एम एम एस) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थिनींनी गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. रोशनी सुरेश भालेराव आणि तृप्ती सुधीर माने या विद्यार्थिनींनी गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींना दर महिना 1 हजार रुपये प्रमाणे 12 हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती सलग चार वर्षे केंद्र शासनामार्फत दिली जाते.
तसेच विद्यालयातील पाच विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना देखील प्रतिवर्षी 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब वाघोले, दत्तात्रय शेलार, गोपाळ शेलार, भीमा पाटस चे संचालक विकास शेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी वाघोले, किशोर शेलार, पांडुरंग शेलार आणि शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांनी अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना देशमुख एच. डी, बोंबे एस. आर व व्यवहारे एन. एस यांनी मार्गदर्शन केले.