पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्याकरिता संकेतस्थळावर ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी अर्जाची मूळ प्रत व त्याअनुषंगिक कागदत्राच्या दोन प्रती १५ डिसेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे. महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुऋण वित्त योजना आणि शैक्षणिक योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ अशी होती.
तथापि अद्यापही काही अर्जदारांनी अर्जाच्या मूळप्रती व त्याअनुषंगिक कागदपत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३, १०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे या कार्यालयास सादर केल्या नाहीत, तरी दिलेल्या विहित मुदतीत अर्जाची मूळप्रत व त्याअनुषंगिक कागद्रपत्रे सादर न करणाऱ्या अर्जदारांचे कर्ज प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती मांजरे यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली आहे.