राहुलकुमार अवचट
यवत : केडगाव (ता. दौंड) येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय फूड फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. वर्ल्ड फुड डे च्या निमित्ताने फेस्टिवलचे आयोजन बी. वोक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
या फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी ३६ इनोव्हेटिव्ह, न्यूट्रिशियस यासह अनेक रेसिपीज बनवल्या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून अंगीर उत्पादक व तरुणांचे प्रेरणास्थान समीर डोंबे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय संधी यावर मार्गदर्शन केले. व उच्च शिक्षणाचा व शेती व्यवसायाचा फार मोठा संबंध असुन तरुणांनी शेतीपुरक व्यवसाय करावे. यासह अनेक अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यक्रमास नेताजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, डॉ. तन्वीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख प्रा. ओंकार अवचट तसेच बी. वोक विभागाच्या को-ऑर्डिनेटर प्रा. मनीषा जाधव यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अरविंद मिंधे,
प्रा.श्रद्धा जगताप, वैभव शेळके यांचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल दिवेकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. ओंकार गायकवाड यांनी केले.