Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी स्पर्धेत सहभागी व्हावं; प्राचार्य गवळी यांचं मत

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 19 January 2024, 20:24
students should participate in each competition says principal Gawali

लोणी काळभोर : सध्याचा काळ कौशल्य विकासाचा असून, अशा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांच्या सप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे, असे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव तथा प्राचार्य सीताराम गवळी यांनी सांगितले.

श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा समारोप कार्यक्रम शुक्रवारी (ता.१९) झाला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सीताराम गवळी बोलत होते. यावेळी समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य ए. के. मंजुळकर, इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, कन्या प्रशालेच्या प्राचार्या एन. एम. झिंजूरके, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धांच्या माध्यमातूनच चिमुकल्यांच्या कलागुणांना मिळते प्रोत्साहन

यावेळी बोलताना प्राचार्या पौर्णिमा शेवाळे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जशी वाट मोकळी करून दिली जाते, त्या वाटेने त्यांची बुद्धी चालायला लागते. या स्पर्धांच्याच माध्यमातूनच चिमुकल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी साकारलेल्या एकापेक्षा एक अप्रतिम अशा कलाकृती बघून मनस्वी समाधान आणि आनंद मिळाला. यावेळी शाळेतील मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

 

विविध स्पर्धांचे आयोजन

स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला , निबंध, क्रीडा, हस्ताक्षर कला व विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५ वी ते १० वी च्या काही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तसेच ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा भरविला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेल्या वस्तू, भाजीपाला, नाष्टा, स्टेशनरी, गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल लावले होते. मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, असा यामागील उद्‌देश होता.

दरम्यान, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच प्रियंका काळभोर यांनी श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाला भेटी दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात 9नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर! विभागीय आयुक्तांचा थेट आदेश; नेमकं कारण काय?

Saturday, 24 October 2026, 14:15

शंकर महाराजांचं दर्शन घेतलं अन् काही क्षणांत अनर्थ! पुण्यात 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Saturday, 24 October 2026, 14:12

पुण्यात महानगरपालिकेची भिंत अचानक गेली चोरीला; नेमकं प्रकरण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 13:59

500 कोटींच्या आरोपाने महायुतीत ठिणगी! शिंदे–जरांगेंचा संघर्ष आता चौकशीच्या फेऱ्यात

Saturday, 24 October 2026, 13:45

गरोदर पत्नी घेत होती कापूरची वाफ, पती अचानक जवळ आला अन् पत्नीची केली हत्या; हिंजवडीत नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 13:15

गराडे येथे कोयता बाळगून फिरणारे तिघे पोलिसांच्या रडारवर; नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 13:01
Next Post
Know about history of pune gangwar

भावाची हत्या झाली त्याच ठिकाणी ठोकलं शरद मोहोळला, पुण्यातील गँगवॉरचा इतिहास काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp