पुणे : पिरंगुट तालुक्यातील मुळशी येथील संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत हे वृक्षरोपण करण्यासाठी बिया देऊन करण्यात आले.
सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरणाचा ऱ्हास, पाणी टंचाई या सर्वांवर आपल्याकडून काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. यासाठी या वर्षी विद्यार्थ्याना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे व ते वाढवले पाहिजे.
यासाठी संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व शिक्षकांनी झाडे लावण्यासाठी बियांचे वाटप केले व त्या आपल्या घराच्या आजुबाजूला रस्त्याच्या कडेने जिथे मोकळी जागा असेल तिथे लावण्यास सांगितले. पालक व विद्यार्थीनीहीं या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाची कल्पना प्रशांत देशमुख यांनी मांडली.
मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी शाळेत संस्थेचे चेअरमन शिवाजी साठे, मुख्याध्यापिका स्नेहा साठे, पालक, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.