उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांचा शाळेचा पहिला दिवस शाळेतील शिक्षकांनी आगळावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी मुलांना गुलाबचे फूल, गणवेश, पुस्तके, चॉकलेट, व गोड जिलेबी देऊन पहिली ते चौथीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व सवित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन पहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांच्या हस्ते करून सर्व मुलांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सरपंच गणेश टिळेकर, सदस्य गोवर्धन टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, मच्छिंद्र टिळेकर, मुख्याध्यापक गुणवंत गायकवाड, शिक्षिका अजिता गांजाळे, अश्विनी टिळेकर, सोनाली भुजबळ, अलका भालेराव, अर्चना भालेराव, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्व विद्यार्थ्यांना सरपंच गणेश टिळेकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व नवगतांचे स्वागत करण्यात आले. आभार मुख्याध्यापक गुणवंत गायकवाड यांनी मानले.








