राजेंद्र कुमार गुंड
माढा : आज मोबाईल, टीव्ही, संगणक, इंटरनेट, फेसबुक आदी मनोरंजनाच्या बाबीमुळे आजच्या पिढीला काही प्रमाणात का होईना शिस्त व वडीलधाऱ्या मंडळींच्या संस्कारांचा विसर पडत आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच शिस्त व संस्कार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केले आहे.
ते कुंभेज ता.माढा येथे (कै.) शंकराराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या वेळी बोलत होते.
शिबिराचा शुभारंभ श्री संत गाडगेबाबा व (कै.)बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आला.
यावेळी बीडीओ डॉ. संताजी पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक अंगाचा विकास होऊन त्यांच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा वाढीस लागण्यास मदत होते. या शिबिरातून ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, प्रदूषण रोखणे आदी विषयाबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यास मदत होते.
यावेळी सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील व सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा, प्राचार्य सुभाष नागटिळक, प्राचार्य चंद्रकांत ढोले, सरपंच परमेश्वर कांबळे, उपसरपंच मदन आलदर, चेअरमन औदुंबर पाटील, नवनाथ नागटिळक, प्रदीप चौगुले, लक्ष्मण राख, कवी फुलचंद नागटिळक, केंद्रप्रमुख विष्णू बोबडे, ग्रामसेवक सुजित जुगदार, तलाठी संतोष कांबळे, धुळा भिसे, अहमद काझी, विठ्ठल नागटिळक, चंद्रकांत होनमाने, प्रशांत सरवदे, वैभव नागटिळक, शहाजी साठे, देवराव नागटिळक, बिभीषण नागटिळक, दिगंबर होनमाने, सुनंदा आलदर, जयश्री नागटिळक, शुभांगी पाटील, भाग्यश्री गवसाने, गीता होनमाने, सविता होनमाने यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.