पुणे : शनिवारचा दिवस होता. दिवसभर ऑफिस मधील काम करून घरी निघण्याच्या गडबडीत होतो. त्यावेळी माझा बालमित्र उत्तम चा मला फोन आला. मी फोन उचलून उत्तमला सांगितलं की तुला मी नंतर कॉल करतो. पण त्यावेळी त्याचा माझेसी बोलण्याचा सुर होता. त्यामुळे मी त्यास नकार देऊ शकलो नाही. कारण त्याचा बोलण्याचा सूर असण्याचे कारण त्याचे व्यवसायाच्या दृष्टीने अर्जंट होतं. साहेब, मला सांगा ! माझं केशकर्तन दुकान उघडू शकतो का या लॉकडाऊनमध्ये?
मी म्हटलं नाही रे मित्रा! त्यानंतर त्याने साहेब ठीक आहे तुम्ही बिझी आहे. म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर माझ्या मनामध्ये त्याने फोन कट केला म्हणून खंत निर्माण झाली. स्वतःवर भयंकर राग व चीड आली.
उत्तम म्हणजे माझा बालपणीचा मित्र माझे मामाच्या घराशेजारी त्याचे घर. लहानपणी आम्ही दोघे एकत्रच खेळायचो. त्याचे आणि माझे एकदम चांगलं जमायचं. पण अलीकडे त्याच्या नजरेतून मी साहेब झाल्या पासून आमच्यामधील भावनिक दुरावा वाढत चालला असल्याची मला जाणीव होत आहे. पण माझ्या नजरेत उत्तम हा माझा बाल मित्रच राहणार आहे. कित्येक वेळा सांगूनही तो मला साहेबच म्हणतो. हीच माझ्या मनात त्याच्या बदलचा राग!
पण परत विचार करतो त्याचे पण काय चुकले ?समाज मनात व्यक्तीपेक्षा पद प्रतिष्ठेला आलेल महत्त्व …हे त्याच्या अंगवळणी पडलेले दिसत.
खरंच पद- प्रतिष्ठा ही माणसापासून माणसाला वेगळ करणारे ठिकाण आहे का?
नक्कीच नाही! पण असे जर होत असेल तर ते पद व प्रतिष्ठा प्राप्त करणाऱ्या व्यक्ती हा तसा फरक मनामध्ये ठेवत असेल.
आपली पद व प्रतिष्ठा हे आपल्याला दिलेले जनसेवेचे साधन अशी असली पाहिजे. पण अलीकडे पद व प्रतिष्ठा प्राप्त करणे म्हणजे आपण समाजा पेक्षा आपण सर्व श्रेष्ठ आहोत हा अहंकार व्यक्तीचा स्वभाव गुणधर्मामध्ये आढळून येऊ लागला आहे. त्यामुळे मित्र -मैत्रिणी , भाऊ -बहीण व इतर नात्यांमधील दुरावा वाढत चालला आहे.
पद प्रतिष्ठेमुळे व्यक्ती- व्यक्ती मधील दुरावा निर्माण होण्यास, त्या व्यक्ती बरोबर समाज तितकाच कारणीभूत आहे. व्यक्तीची समाजात जडणघडण होत असताना त्यांना समाज माणसातून एकच धडा मिळत असतो, तो म्हणजे पद व प्रतिष्ठा प्राप्त हेच उच्च अधिकार व हक्क प्राप्ती! पण त्या पद प्रतिष्ठा प्राप्त केल्यानंतर आपले वर्तन कसे असावे? याबद्दल कोणतेही शिक्षण समाज मानसात मिळत नाही.
याउलट एखादा पद – प्रतिष्ठा मिळालेला व्यक्ती समाजामध्ये त्यांच्यात मिळून-मिसळून राहत असेल तर त्या व्यक्तीला त्याचे पद प्रतिष्ठा याची आठवण करून देऊन, तू समाजापेक्षा श्रेष्ठ आहेस ,असा आभास निर्माण केला जातो.
त्यामुळे काही व्यक्ती याच गोष्टीचा फायदा घेऊन समाज आपल्या मुठीत, गुलाम, मी सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञानी व सर्वशक्तिमान असा आहे अशी काल्पनिक प्रतिमा तो समाज मनावर तयार करतो.
अमेरिकेसारख्या देशाची एकच गोष्ट मला फार आवडते. ती म्हणजे अति उच्च पदावर असणारा व्यक्ती पायउतार झाल्यानंतर सामान्य व्यक्ती म्हणून जीवन जगतो. यालाच तर मानवी स्वभावाची प्रगल्भता म्हणतात. पण आपल्या देशात या प्रगल्भतेचा अभाव दिसतो.
एखादा व्यक्ती पद प्रतिष्ठा प्राप्त झाली की, तो व्यक्ती आयुष्यभर आपल्या पद प्रतिष्ठेला चिकटून राहतो. का होते असे? आपली पद प्रतिष्ठा ची व्याख्या काही चुकते का? अजिबात नाही! चुकते ते फक्त …आपण घेतलेला व्याख्येचा चुकीचा अर्थ.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी प्राप्त पदप्रतिष्ठेचा कोणताही अहंकार आपल्या मनासी बाळगला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा समाज मनामध्ये आदर्शवत अशी आहे. त्यांनी 50 डॉक्टरेट, पद्मश्री, पद्मभूषण , भारतरत्न अशी अनमोल संपती मिळवली. का अशा लोकांचा आदर्श समाज व्यक्ती घडत असताना देत नाही? का असतात आपले आदर्श अहंकारी, स्वार्थी ,भ्रष्ट व्यक्ती ?
प्रद – प्रतिष्ठेचे अहंकारामुळे आपला जिवलग – नातेवाईक यांच्यापासून दूर होऊ लागलो हे मात्र नक्की. पद प्रतिष्ठा प्राप्त व्यक्तीने त्या पद व प्रतिष्ठेला स्वतःचे आर्थिक विकासापेक्षा त्या पदाचा उपयोग समाजाचे विकासाकरिता केला पाहिजे. याकरिता प्रथम समाजाची वैचारिक प्रगल्भता वाढण्याकरिता नक्कीच प्रयत्न करावे लागतील. त्याकरिता आपले पद प्रतिष्ठा हे फक्त ऑफिस मध्ये ठेवून नंतरचे आपले वर्तन हे सामान्य व्यक्तीसारखे असले पाहिजे.
सर्व आपण एकाच मातीची लेकरू, तर आपण का करतो? हे पद प्रतिष्ठेचा अतिअहंकार. खरंच आपण काहीतरी बदल केला पाहिजे. स्वतःमध्ये व सामाजिक मानसिकतेमध्ये… तरच घडवू एक माणूस व एक आदर्शवत समाज !.