Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येडगाव धरणातील बेकायदा आवर्तन बंद करा, अन्यथा आंदोलन करणार; जुन्नर शेतकरी संघटनेची आग्रही मागणी

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Tuesday, 5 September 2023, 13:51

शुभम वाकचौरे
जांबूत : जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या नद्यांना पाणी न सोडता, पाटबंधारे विभागाने बेकायदेशीर कालव्यातून नगर जिल्ह्याला ३० दिवसांच्या आवर्तनातून पाणी सुरू केले आहे. येडगाव धरणाचे पाणी तत्काळ बंद करावे, अन्यथा जुन्नर शेतकरी संघटना आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष सचिन थोरवे यांनी दिला.

थोरवे म्हणाले की, राज्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. धरण क्षेत्रात देखील अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीसाठी मर्यादीत आहे. पुढे पाऊस होईल की नाही, याची शाश्वती नाही. येडगाव धरणामध्ये सध्या केवळ २७ टक्के इतका पाणीसाठा आहे. या धरणात अनेक वर्षांपासून गाळ साचलेला असल्यामुळे फक्त १६ ते १७ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.

या धरणातील पाणी कालव्याद्वारे नगर जिल्ह्यामध्ये सोडले जात आहे. पाण्याचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे पाणी बंद न झाल्यास, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर भविष्यात पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते. येथील जनावरे चारा व पाणी न मिळाल्याने मृत पावू शकतात. या भागातील नद्या कोरड्या असताना हे बेकायदेशीर आवर्तन बंद करावे. भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी तरतूद ठेवावी, असे थोरवे यांनी स्पष्ट केले.

 

शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे, तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, तालुका संघटनेचे उपाध्यक्ष अजित वालझडे व अजित वाघ, युवा अध्यक्ष सचिन थोरवे, प्रमोद खांडगे, शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी पत्रकाद्वारे ही मागणी पाटबंधारे विभागाचे अधिकारी रावळे यांच्याकडे केली आहे.

पालकमंत्री आणि कालवा सल्लागार समितीची बैठक पुण्यातील सिंचन भवन येथे आहे. येथे हा विषय चर्चेला घेऊ. तोपर्यंत आपण हे आंदोलन स्थगित करावे, असे निवेदन शेतकरी संघटनेला दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु पाणी बंद न केल्यास शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक होऊन याठिकाणी आंदोलन करेल, असा इशारा तालुका अध्यक्ष संजय भुजबळ व युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी दिला.

या वेळी जुन्नर पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधरी यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या समजून घेतली. नारायणगाव पोलीस ठण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी बंदोबस्त ठेवला होता. उपस्थित सर्वांचे आभार संजय भुजबळ यांनी मानले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55
Next Post

पुणे महापालिकेमध्ये काम बंद आंदोलन; भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.