अमोल दरेकर
सणसवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयाेजित केलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी आणि ८ वी) या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार २ जुलै राेजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आठवीतील स्वरदा प्रल्हाद दरेकर ही २७२ गुण मिळवत राज्यात आठवी, तर अनुष्का सुखदेव हरगुडे २६४ गुण मिळवत राज्यात पंधरावी आली आहे.
यशाची परंपरा कायम राखत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत अठरा विद्यार्थी पात्र झाले आहेत. घोरबांड गणेश संतोष (गुण-244),दरेकर समृद्धी सुधीर (गुण-234), वडघुले श्रेया बापू (गुण-226), लोखंडे प्रांजल विनोद (गुण-224), जाधव संस्कार अमोल (गुण-222), करांडे आदित्य बापूराव (गुण-220), धुमाळ संकेत संजीव (गुण-216), कदम प्रियदर्शनी निलेश (गुण- 210), तांबडकर वैभवी तुकाराम (गुण-208), नरवडे पवन सुधाकर (गुण-208), नरके संदेश शरद (गुण-206), हरगुडे गणेश नवनाथ (गुण-206), उगले श्रुती सचिन (गुण- 204), काळे विराज गोपीचंद (गुण- 204), कांबळे प्रणिती दुर्योधन (गुण-202), डांगे पृथ्वीराज बबन (गुण-194), हरगुडे श्रीराज अजय (गुण-192), इप्पर जयश्री तिरुपती (गुण-192) अशी यश सांपादन केलेल्या विध्यार्थ्यांची नावे आहेत.
यावेळी मुख्याध्यापिका राधिका मेंगवडे, मनीषा फुंदे, ज्योती बोरावणे, अशोक वाढवणे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विध्यार्थ्यां मान्यवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष माजी उपासभापती आनंदराव हरगुडे, सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, तालुकाध्यक्ष कामगार आघाडी अशोक हरगुडे, व्हा. चेरअमन शहाजी दरेकर, शाळा व्यस्थापन उपाध्यक्ष सारिका हरगुडे, समिती सदस्या धोत्रे, शिक्षणतज्ज्ञ गणेश दरेकर, प्रल्हाद दरेकर, सुखदेव हरगुडे, विद्याधर दरेकर, सागर हरगुडे, अशोक दरेकर, भाजपा नेते बाळासाहेब दरेकर यांच्या सह व्यवस्थापन सदस्य, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल पिचके यांनी केलं.