-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील महाराष्ट्र जीत कुने दो अजिंक्यपद स्पर्धा 2024 नुकतीच झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी येथील मा. बापूसाहेब गावडे विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीची राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
या स्पर्धेत वजनगट 17 वर्षाखालील वयोगटात मिजबा शौकत मुजावर वजन गट 46 ते 49, तनिशा शौकत मुजावर वजनगट 42 ते 46 यश प्राप्त केले आहे. मा.बापूसाहेब गावडे विद्यालयाचे नाव राज्य पातळीवर चमकवले असुन खेळ क्षेत्रात विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र जित कुने दो अजिंक्यपद स्पर्धेत निवड झाली आहे.
शिलॉग हिमाचल प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या खेलो इंडिया वुमेन्स लिग 2024 च्या राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यालयाचे प्रा.आर.बी. गावडे, अजित गावडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. मिशन मृत्युंजय गर्ल सेल्फ डिफेन्स महाराष्ट्र विभागाचे प्रमुख प्रमोद फुलसुंदर, नॅशनल पंच शेख शौकत मुजावर यांनी प्रशिक्षण दिले.
निवड झालेल्या विद्यार्थीनींना संस्थेचे संस्थापक माजी आमदार पोपटराव गावडे, जि.प.सदस्या सुनीताताई गावडे, राजेंद्र दादा गावडे, हॉटेल विश्व पॅलेस उद्योग समुह पै.तुकाराम उचाळे, आदर्श विद्यालयाचे प्रा.चौधरी, कालीकामाता विद्यालय वाघाळे, चांडोहचे पो.पाटील सुदर्शन भाकरे, मुस्तका यंग सर्कल, पोलीस मित्र समस्त ग्रामस्थ, शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.