पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बुधवारी बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत अनेक सदस्य अनुपस्थित राहिल्याने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीवर केवळ चर्चा करण्यात आली असून गुणांकन प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे येत्या ४ जानेवारीला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचे तत्कालीन अध्येक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे इतर तीन सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारने तातडीने आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे, संयुक्त विद्यमाने पुरस्कारांचे वितरण डॉ. डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, पुरस्कार समितीचे निमंत्रक किशोर बेडकिहाळ, विजया भोळे, माधुरी सुमंत आदी उपस्थित होते.
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने नवनियुक्त अध्यक्ष शुक्रे यांनी नागपूर येथेच पहिली बैठक घेतली. त्यानंतर नियोजनाप्रमाणे पुण्यात बैठक निश्चित करण्यात आली होती. या बैठकीचे पत्र पाठवूनही बैठकीत ११ सदस्यांपैकी केवळ अध्यक्षांव्यतिरिक्त केवळ पाच ते सहा सदस्य उपस्थित उपस्थित होते. त्यामुळे मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून त्यासाठी गुणांकन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.