राजेंद्रकुमार शेळके ( पुणे ) : कवी वादळकार यांनी ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पुर्ती केली आहे. गेली ७५ वर्षात ज्या गावात कधीही एस.टी.गेली नाही. अतिदुर्गम भाग हा उपेक्षित होता. त्या आदिवासी बांधवाना एक जीवनाच्या आनंदाची पर्वणी दिलेली आहे. विविध उच्च स्तरावर पाठ पुरावा करुन एस.टी.महामंडळ विभाग व विविध विभाग डेपोमध्ये पञव्यवहार करून या कामाला यश मिळाले आहे. याकामी महाराष्टाचे कार्यक्षम मुख्यमंञी श्री एकनाथ शिंदे यांचे विशेष सहकार्य मिळाले. त्यांच्या सहाय्यक स्वीकीय मंडळींचे सुध्दा विशेष सहकार्य मिळाले आहे. सातत्य पाठपुराव्याला सरकारी पातळीवर दखल घेण्यास लावल्याने हे यश अनेक वर्षांनी मिळाले आहे.
याप्रसंगी कवी वादळकार म्हणाले, एस.टी. सेवा सुरू करण्याच्या कामात फोफसंडी ग्रामस्थ, उपसंरपच, सरपंच, कवी यशवंत घोडे, रमेश घोडे, संजय घोडे. सुरेश वळे, भगवान घोडे, राजू घोडे, दत्ताञय मुठे, मंगेश कोंडार, दगडू भगत, पांडुरंग वळे इ.यांचे सहकार्य मिळाले. मुख्यमंञ्यांचे हे विशेष सहकार्य लाभले. बससेवा सुरु करण्यासाठी शिवाजीनगर,नारायणगाव,अकोले एस.टी.डेपोचे सुध्दा विशेष सहकार्य लाभले आहे. फोफसंडी या गावी पावसाळ्यात पर्यटनासाठी गेल्यावर ग्रामस्थांच्या समस्यांची माहिती घेतली. त्यांना यावेळी कवी वादळकार यांनी फोफसंडी एस.टी.सेवा सुरु करणारच अशी ग्वाही दिली आणि एस.टी,सेवा सुरु केली आहे. लवकरच तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याचे ही काम पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला ग्रामस्थानी अशाप्रकारे सहकार्य केल्यास लवकरच आरोग्य सेवा सुध्दा सुरु करु, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहे. अशी भावना व्यक्त यावेळी केली. फोफसंडी गावासाठी मुक्कामी बससेवा देण्यात आलेली आहे. या एस.टी.मुळे कामाला गेलेले मजूर वर्ग तसेच कॉलेज, शालेय विद्यार्थी वर्ग वेळेवर घरी पोहचू शकेल. तसेच सकाळी सुध्दा वेळेवर जाण्यासाठी या बसचा उपयोग होणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही एस.टी.सेवा गावातून सुरु झाल्यामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
फोफसंडी गावाच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. फोफसंडीला महाराष्टाचे मौरीसेस सुध्दा संबोधले जाते. यासाठी नक्षञाचं देणं काव्यमंच व साईराजे टूर्स हौलिडेज,पुणे ची त्यांना मदत मिळत आहे.नुकतेच यावर्षी पर्यटकांसाठी विविध धबेधबे व स्थळांची माहिती व्हावी म्हणुन विनामूल्य नामफलक बोर्ड देऊन स्पॉटला लावण्यात आले आहे.आता फोफसंडीला एस.टी.सेवा आणि लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा देण्याचा कवी वादळकार यांनी संकल्प केला आहे.