सासवड : पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर मंदिरात मोठ्या उत्साहात नारायण महाराजांच्या आशीर्वादाने व नारायणधाम हॉस्पिटलचे डॉ. उमेश डोंगरे यांच्या दक्षतेखाली, श्रीनारायण महाराज यांचे गुरु पुजन करण्यात आले. यावेळी सर्व भावीक भक्तांना संपूर्ण गुरु पुजन व दर्शन ऑनलाईन घडवले. यामुळे हजारो भविक मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यानंतर भजन होऊन आरती करण्यात आली.
श्री क्षेत्र नारायणपुरात आज पहाटे दत्तमहारांजाच्या पादुकांना रुद्र अभिषेक घालण्यात आला. तर मूर्तिची पूजा व मंदिरात फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली. दरम्यान, आज मंदिर पहाटेपासूनच दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. सकाळी साडे नऊ वाजता नेहमीची आरती करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तर सकाळी साडे अकराला गुरु पूजेची तयारी करून गुरूंच्या पूजेसाठी सुरुवात झाली. त्यानंतर आरती करून दत्तमहारांजाचा “दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” चा जय घोष करण्यात आला.
यावेळी मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजचा दिवस म्हणजे व्यास महर्षीचा आहे. माणसाला कितीही सांगा माणसाला संगतीचा परिणाम होतो हे व्यास मुनींनी सांगितले तसेच त्यांनी अनेक ग्रंथ लिहले. त्यांना संगत ऋषीं मुनीनीची होती त्यामुळेच ते घडले. तर शेवटी टेम्भे स्वामी महाराज यांचे व्यख्यान होऊन कार्येक्रमांची सांगता झाली.
यावेळी वाशी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पनवेल पाटील, आमदार संजय जगताप, आमदार संग्रामदादा थोपटे, माजी आमदार उल्हासदादा पवार, विश्व्हिंदू परिषदेचे मंत्री वेदकदादा पाठक, एम. पी. चे आमदार पायीतल मेटाजी, आदी मान्यवर, भाविक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.