लोणी काळभोर, (पुणे) : मास्टर्स गेम्स असोशियन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील क्रीडा शिक्षक भाऊसाहेब यशवंत महाडिक यांनी दोन पदके पटकाविली असून महाडिक यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक महाडिक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नाशिक येथील महाराष्ट्र राज्य विभागीय क्रीडा संकुलाचे मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये नुकत्याच स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत राज्यातील हजारो खेळाडू आर्मी दलाचे खेळाडू, पोलीस दलाचे खेळाडू, एअर फोर्स विभागाचे खेळाडू, आयकर विभागाचे खेळाडू विविध शासकीय विभागाचे खेळाडू, शिक्षक, राष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत महाडिकही सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाडिक यांनी बांबू उडी प्रकारात द्वितीय क्रमांक व तिहेरी उडी प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे. महाडिक यांची पुढील वर्षी फेब्रुवारी २०२४ रोजी गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेचे आयोजन मास्टर्स गेम्स असोशियन चे महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळा चव्हाण, मास्टर्स गेम्स असोसिएशन पुणे विभागाचे जिल्हा सचिव महेंद्र बाजारे, मास्टर्स गेम्स असोशियन चे महाराष्ट्र राज्य सह सचिव धनंजय मदने, आयकर विभागाचे अधिकारी आंतरराष्ट्रीय खेळाडू दत्तात्रय सरडे, सहाय्यक अधिकारी चंद्रशेखर पाटील, आयकर विभाग पुणे विभागाचे अधिकारी सुजित बडदे, एअरफोर्स दलाचे अधिकारी संतोष पवार, अहमदनगर पोलीस विभागाचे पोलिस हवालदार अन्सर आली सय्यद यांनी केले होते.
दरम्यान, क्रीडा शिक्षक भाऊसाहेब महाडिक यांनी मिळविलेल्या यशाबद्दल ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री, ओम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका इराणी मॅडम, संचालक अविनाश सेलुकर यांनी अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी शाळेच्या प्राचार्या शमशाद कोतवाल, प्राचार्या खुशबू सिंग, मुख्य व्यवस्थापक खानसाहेब शेख व शिक्षकवृंद व कर्मचारी आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब महाडिक हे क्रीडा शिक्षक असून प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य आहेत. महाडिक यांनी पत्रकारीतेसह क्रीडेची आवड जपली आहे. अशा तंदुरस्त क्रीडा शिक्षकाचा जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश मोहरे, संभाजी खलाटे यांनी अभिनंदन आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.