उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी तरुण मंडळाच्या वतीने मयुरेश सुनील गोते यांच्या स्मरणार्थ श्री गणराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन व अक्षय ब्लड बँकेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आश्रम रोड गणपती मंदिराशेजारी करण्यात आले होते.
शिबिरामध्ये ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर ३०० पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी केली. यामध्ये नेत्र तपसणी, इसीजी, शुगर बीपी तपासनी व इतर शारीरिक तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरामध्ये श्री गणराज हॉस्पिटलचे संचालक डॉ. मयूर पुस्तके व डॉ. समीर ननावरे, अपेक्षा पुस्तके, व त्यांचे सहकारी डॉ. अविनाश सकट, राहुल कहार, मीनाक्षी धायगुडे, शेहनाझ शेख, मेघा कुंजीर, मोनाली चव्हाण, बाप्पू मोरे, यांनी समावेश होता. यावेळी प्रत्येक रक्त दात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.
दरम्यान या सर्व शिबिराचे आयोजन लाईफ केअर उद्योग समुहाचे संचालक सिद्धू चव्हाण यांनी केले व महात्मा गांधी तरुण मंडळ यांच्या अतिरिकेखाली हा उपक्रम पार पडला.
यावेळी राजाराम कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित बाबा कांचन, स्वप्नील कोतवाल, सुजित कांचन, अनिल कांचन, मयूर गोते, प्रसाद कांचन, निखील मुरकुटे, अमित कांचन, शुभम शंकर, यश मुरकुटे, जीवन कांचन व महात्मा गांधी मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.