युनूस तांबोळी
शिरूर : सण, उत्सवांना अध्यात्माची जोड दिली जाते. त्यातून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे असते. गावागावात असे सण, उत्सव सर्व समाजात साजरे व्हावेत यासाठी गावातील प्रमुखांनी पुढाकार घ्यावा, असे मत अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
सविंदणे (ता. शिरुर) येथे श्री क्षेत्र भैरवनाथ महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. नऊ दिवसांच्या या सोहळ्याची सांगताआळंदी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास पूर्वा वळसे पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, शिरुर पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, सरपंच शुभांगी पडवळ, उपसरपंच नंदा पुंडे, माजी सरपंच वसंत पडवळ, माजी सरपंच सोनाली खैरे, माजी उपसरपंच भोलेनाथ पडवळ, माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष लंघे, ईश्वर पडवळ, रवी पडवळ, मनीषा नरवडे, मालू मिंडे, डॉ. टेमगिरे, निवेदक निलेश पडवळ, पुणेकर-मुंबईकर मंडळ छबिना मंडळाचे सर्व पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.