पुणे : पुणे विमानतळावर स्पाईसजेट विमान कंपनीचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना काल रविवारी (ता.२९) संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून अहमदाबादला जाणारे विमान दुपारी अडीच वाजता उड्डाण करणार होते. विमानाची वेळ झाल्यानंतर प्रवाशांना विमानात बसवण्यात आले. त्यानंतर विमान गरम झाल्याचे कारण देत उतरवण्यात आले.
दरम्यान, प्रवासी विमानतळावर विमानाची वाट पाहत थांबवले होते. त्यानंतर संध्याकाळी ७.१५ वाजता विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानतळावर विमानाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. आणि स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांशी आणि प्रवास्यांची जोरदार वादावादी झाली आहे.