पुणे : प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील 1344 श्रीरामभक्त विशेष आस्था एक्स्प्रेस रेल्वेने अयोध्या येथे गेले आहेत. मंगळवारी (दि.१३) सायंकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी ही विशेष रेल्वे गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सोडण्यात आली असून, उद्या (दि.15) सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी अयोध्येत दाखल होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
हे सर्व १३४४ श्रीराम भक्त 24 तास आयोजनात राहणार असून, सर्वांची निवास भोजन आणि इतर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनाची देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये आणि अयोध्येत देखील भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. केंद्र सरकारने अतिशय वाजवी दरामध्ये रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल शरद बुट्टे पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांचे विशेष आभार मानले.
ही रेल्वे गाडी 16 फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी परत निघणार असून, १८ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता पुणे रेल्वे स्टेशन येथे पोहोचणार आहे. या १३४४ भाविकांमध्ये जुन्नर आंबेगाव शिरूर खेड हवेली आणि हडपसर या परिसरातील श्रीराम भक्तांचा समावेश आहे.
मंगळवारी रात्री पुणे रेल्वे स्टेशनवरून या विशेष असतात. एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, डॉ. ताराचंद कराळे, भगवान शेळके, तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे (शिरूर), श्याम गावडे (हवेली), मारुती शेळके (शिरूर बेट), संदीप बानखेले (आंबेगाव), संजय थोरात, अमित सोनवणे, महिला मोर्चा अध्यक्ष पूनम चौधरी, सुनील देवकर, बापू काळे यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रेन प्रमुख म्हणून नितीन वाघमारे, कोच प्रमुख म्हणून अमोल राऊत, वैशाली तांबे, पुजा सनस, सचिन पांडे, दत्ता टेमगिरे, अश्विनी पांडे, सागर राळे, अर्चना बुट्टे, प्रीतम शिंदे, महेंद्र पिंगळे, श्रीराम बांगर, भगवान शेळके आदी काम करत आहेत. ज्ञानेश्वर नरके, राजश्री जाधव, निलेश भुजबळ, प्रमोद टिळेकर, शोभा लगड, अनिल येवले, ओमकार सोनार हे १८ जण काम पाहत आहेत.