लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरात ‘युवकांचा ध्यास, ग्राम व शहर विकास’ आणि ‘लोकसंख्या नियंत्रण जनजागृती’ या उपक्रमांतर्गत हळदी-कुंकू कार्यक्रम आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात आले.
समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर सोरतापवाडी गावात संपन्न होत आहे. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायत व समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या चौधरी, साधना सहकारी बँकेच्या संचालिका वंदना काळभोर, ग्रामपंचायत सदस्या पूनम आढाव, मनिषा चौधरी, स्नेहल चौधरी उपस्थित होत्या. या वेळी महिला व विद्यार्थिनींना वंदना काळभोर, संध्या चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. स्नेहा बुरगुल व वाणिज्य विभागाच्या प्रा. खनुजा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सोरतापवाडी गावातील महिला समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. आर. निकम, डॉ. एस. जी. बुरगुल, सदस्य प्रा. किशोर भिसे, प्रा. एस. वाय. कुंभार, प्रा. सुहास नाईक आदी उपस्थित होते.