-बापू मुळीक
सासवड : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या एसयूओ सोनिया रमेश शिंदे हिची भारतीय नौदलातील सीनियर सेकंडरी रिक्रूट (SSR) प्रवेश प्रक्रियेतून निवड झाली आहे. सोनियाने आपल्या अथक परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर ही प्रतिष्ठित कामगिरी साध्य केली आहे. भारतीय नौदलातील सीनियर सेकंडरी रिक्रूट (SSR) ही भरती प्रक्रिया अत्यंत स्पर्धात्मक असते. या प्रक्रियेतून निवड होण्यासाठी उमेदवाराला शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक कसोटीवर उतरणे आवश्यक असते.
सोनिया शिंदे ही वाघिरे महाविद्यालयाच्या 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची छात्र सैनिक होती. तसेच 2022-23 मध्ये तिने थल सैनिक कॅम्प नवी दिल्ली येथे देखील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. 2023-24 मध्ये महाविद्यालयातील एनसीसीमध्ये ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून तिची निवड झाली होती. तिच्या एनसीसी कारकिर्दीत तिला प्रामुख्याने डॉ. शीतल कल्हापुरे (CTO), लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे (ANO) आणि सब लेफ्टनंट सुनील शिंदे यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभले.
एसयूओ सोनिया रमेश शिंदे ही महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिली एनसीसी कॅडेट आहे, जिने भारतीय नौदलात (Armed Forces – Navy) निवड होण्याचा मान मिळवला आहे. तिची ही कामगिरी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
सोनियाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. सुभाष वाव्हळ, डॉ. बी. यू. माने, आणि डॉ. संजय झगडे, पवार नाना तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एनसीसी (2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, 36 महाराष्ट्र बटालियन व 3 महाराष्ट्र नेव्हल युनिट) विभागातील सर्व छात्र सैनिक यांनी तिचे व तिच्या पालकांचे रमेश शिंदे व विद्या शिंदे यांचे देखील अभिनंदन केले. पिसे ,जेजुरी व पुरंदर तालुक्यातून सर्व पदाधिकारी मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे