पिंपरी : तू मला खूप पसंत आहेस, असे म्हणून एका पोलिसाच्या मुलाने महिलेचा विनयभंग केला. ही घटना १२ ऑगस्ट रोजी काळेवाडीतील ज्योतिबानगर परिसरात घडली. कुणाल शरद मोरे (वय ३०, रा. पोलीस लाईन, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत थेरगाव येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. १५) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल याने पीडित महिलेला फोन करून भेटण्यासाठी थांबविले. त्यानंतर महिलेला कारमध्ये बसवून तिला काळेवाडीतील ज्योतिबानगर येथे नेले. रस्त्याच्या कडेला कार थांबवून मला तू खूप पसंत आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे बोलून महिलेचा विनयभंग केला. तिने आरोपीला विरोध केला असता त्याने महिलेला मारहाण केली. तर, कोणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.