पुणे : पुण्यातील कोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअरने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑफिसमधील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या आरोपीने महिला सहकाऱ्यावर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून दाऊद युसूफ दर (२७, कोरेगाव पार्क, मूळ बारामुल्ला, काश्मीर) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते १७ मार्च दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दाऊद हे एकाच ऑफिसमध्ये कामाला आहेत. आरोपीने फिर्यादी यांच्याशी ओळख करून जवळीक साधली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढंच नाही तर हॉटेलमध्ये दोघांचे फोटो काढले.
त्यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता हॉटेल मधील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने कोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निमकर करीत आहेत.