पुणे : पुण्यातील उन्हाचा चटका कमी-जास्त होत आहे. शुक्रवारी (दि. ३) शहरात कमाल तापमानाचा पारा ४०.१ अंश सेल्सिअस इतका होता. तर, मगरपट्टा येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
शुक्रवारी सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात नोंदविले असून, ते १८.३ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या ४ ते ५ मेदरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. तर, ६ ते ९ मे रोजी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. दरम्यान, परिसरात तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. तीव्र उकाड्यानंतर शहरातील कमाल तापमानात किचित घट झाली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी उन्हाचा चटका व उकाडा तीव्र जाणवत आहे. रात्रीच्या किमान तापमानात चढउतार सुरू असून
शुक्रवारी वडगावशेरी येथे कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस होते. तर, कोरेगाव पार्क ४१.२, हडपसर ४०.८, पाषाण ४० तसेच एनडीए येथे ४० अंश सेल्सिअस तापमान होते.