पुणे : पुण्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात घुसून झोपलेल्या तरुणीवर जबरदस्तीने बलत्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना कात्रज-कोंढवा रोडवरील असलेल्या फिर्यादीच्या घरी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विश्वास पारडे (वय २९, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. .
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी विश्वास पारडे हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र आहे. त्यामुळे त्यांच्यात ओळख होती. पारडे हा फिर्यादीच्या घरी सतत ये-जा करीत असे. फिर्यादी या घरात झोपल्या असताना त्याने फिर्यादीचे तोंड दाबून शांत बस असे धमकाविले. त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्याच्या मित्राला फिर्यादी यांनी हा प्रकार सांगितला. त्याचा राग मनात धरुन विश्वास पारडे याने फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करीत आहेत.