Shocking News : लोणी काळभोर : जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून परतताना पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस अंमलदार स्वप्नील गरड (वय-३७, रा.) हे ‘ब्रेन डेड’ झाल्याची धक्कादायक घटना घडली. गरड यांना काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस दलातील गरड यांच्या मित्रांनी दिली. (This year is the most dangerous for Mount Everest! Swapnil Gard of the Pune Police Force is ‘brain dead’ while returning from climbing Mount Everest.)
माऊंट एव्हरेस्ट शिखराची उंची ८, ८४८.८६ मीटर इतकी आहे. हे शिखर करण्यासाठी पुण्यातील ६ गिर्यारोहक गेले होते. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलीस अंमलदार स्वप्नील गरड, भगवान चोले, अभिषेक गायकवाड, सुविधा कडलग व लहू उघडे यांचा समावेश होता. (Shocking News) या मोहिमेंतर्गत शिवाजी ननावरे, स्वप्नील गरड, लहू उघडे आणि सुविधा कडलग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
प्रकृती खालावल्यामुळे काठमांडू येथील रुग्णालयात दाखल
पोलीस अंमलदार स्वप्नील गरड हे शिखर सर केले. हे शिखर ६ तासाच्या आत सर करून परत माघारी यावे लागते. मात्र त्यांना जादा वेळ लागला. त्यामुळे परतत असताना गरड यांना हिमदंशाचा त्रास होऊ लागला. गरड यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Shocking News) उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड झाल्याची माहिती त्यांच्या पुणे पोलीस दलातील मित्रांनी दिली. तसेच त्यांच्या कुटुंबात आई, बायको, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, स्वप्नील गरड यांनी मागील वर्षी जगातील सर्वात सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेले नेपाळमधील माउंट अमा दबलम हे शिखर सर केले होते. (Shocking News) हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले.
पुणे प्राईम न्यूजशी बोलताना पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे म्हणाले की, माउंट एव्हरेस्ट शिखर हे चढाईस अत्यंत कठीण असे पर्वतशिखर आहे. माऊंट एवरेस्ट सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता असणे अत्यावश्यक आहे. (Shocking News) उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे नॉर्मल चालताना देखील दमछाक होते. स्वप्नील गरड यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. मात्र उतरताना त्यांना त्रास झाला आहे. त्यांच्या तब्बेतीत लवकर सुधारणा व्हावी. हीच ईश्वराकडे प्रार्थना.