Shocking News : पुणे : एका ३० वर्षीय नराधमाने अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच कोथरूड परिसरात घडली आहे. हा नराधम, ‘तुला खाऊ देतो बाहेर चल,’ असे सांगत मुलीला रस्त्यावर घेऊन गेला. तेथे रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या बसच्या खाली नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे कोथरूड परिसरात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.
कोथरूड परिसरातील घटना
अधिक माहितीनुसार, राजेश चोरगे (वय ३०, रा. बोराटे चाळ, सागर कॉलनी, कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. (Shocking News ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब मूळचे नेपाळ येथील असून, कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले आहेत. नराधम आरोपी हा कुटुंबाच्या ओळखीचा आहे.
दरम्यान, फिर्यादी यांची चार वर्षांची नात घरामध्ये खेळत असताना राजेश चोरगे तेथे आला. पीडित मुलीसोबत तो खेळत होता. खेळता खेळता गोड बोलून तो मुलीच्या जवळ आला आणि ‘तुला खाऊ देतो बाहेर चल’ असे सांगत तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी फिर्यादीने नराधमाला खडसावून सांगितले आणि मुलीला कुठेही घेऊन जाऊ नको असे ठणकावले. (Shocking News ) काही वेळाने लक्ष चुकवून आरोपीने मुलीला शांतीबन चौकात नेले. तेथे उभ्या असलेल्या गाडीखाली घेऊन गेला आणि तिच्या बलात्कार केला. मुलीचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी दोघांनाही बसखालून बाहेर काढले आणि नराधमाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शनिवारी साडेसात ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दिवे घाटात टेम्पो उलटला; एका मजुराचा मृत्यू, १४ जण जखमी
Pune News : धारदार शस्त्राने वार करुन 90 हजारांची रोकड नेणाऱ्या 5 आरोपींना दोन तासांत अटक
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळातर्फे बुधवारी अथर्वशीर्ष पठण; पुण्यात मध्य भागात वाहतुकीत बदल