पुणे : पुण्यामधून तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी करत तरुणीचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी राजेखां करीम पठाण याच्यांसह तिघांना अटक केली आहे.
ही घटना समोर आल्यानंतर सर्व स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे. काल (गुरूवारी) पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमावाने गर्दी केली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत संतापजनक पोस्ट आपल्या सोशल मिडिया शेअर केली आहे. त्यानंतर आता या घटनेबाबत पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
पोलिसांनी सांगितलं घटनाक्रम..
पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, काल (गुरूवारी) रात्री 21 वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. रात्री 11च्या सुमारास ते तिथे गेले होते. 3 लोकांनी मुलांना मारहाण करत अतिप्रसंग केला आहे. या घटनेची माहिती आपल्याला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात एकुण 10 पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण 3 मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेर राज्यातील आहे. बोपदेव घाटात नेहमी लोक वॉकिंगला जात असतात. यावेळी ही घटना समोर आली आहे. मित्राला त्याठिकाणी बांधून ठेवत मारहाण केली होती. मुलगी गंभीर जखमी आहे, तिच्यावरती देखील उपचार सुरु आहेत. आरोपी पुर्णपणे निष्पन्न झालेले नाहीत. पिडीत मुलगी 21 वर्षाची आहे. दोघेही कॉलेजमध्ये शिक्षण घेतं आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
अतिशय संतापजनक!
पुण्यात हे काय सुरू आहे?
बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी…— Supriya Sule (@supriya_sule) October 4, 2024
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय?
बोपदेव घाटात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतापजनक पोस्ट लिहली आहे. सोशल मिडिया एक्सवरती सुळेंनी पोस्ट लिहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये, “अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.