Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या सूपमध्ये सापडलं झुरळ; हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 11 July 2025, 14:22

पुणे: हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवणासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वानवडी भागातील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये घडली असून, याप्रकरणी वानवडी पोलिसांनी हॉटेलचे व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

फिर्यादी अश्विनी रवी शिरसाट (वय ३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, भिवंडी दरबार हॉटेलमधील व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शिरसाट कुटुंबीय १६ जून रोजी रात्री जेवणासाठी वानवडीतील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये गेले होते. जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांना सूप दिले गेले. मात्र, त्यांनी दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याने त्यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापक आणि कामगारांना जाब विचारला. मात्र, या घटनेची त्यांनी केवळ सारवासारव केली आणि जबाबदारी टाळली.

फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, हॉटेल व्यवस्थापनाने भटारखान्यात स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली नाही आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असे पदार्थ सर्व्ह केले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २७५ नुसार (भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार कुंभार करत आहेत.

यापूर्वी विश्रांतवाडी भागातही अशाच स्वरूपाची घटना घडली होती. एका कॅफेमधून मैत्रिणीसाठी मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये मृत उंदीर आढळून आला होता. या प्रकरणीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शहरातील अनेक भागांत गाड्यांवर खाद्यपदार्थ विक्री होत असून, या ठिकाणी स्वच्छतेची पातळी अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. दुषित पाण्याचा वापर व स्वच्छतेची कमतरता ही समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

साध्या दोडक्याचे मोठे फायदे! पचन, वजन नियंत्रणासह अनेक आजारांवर गुणकारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.