पिंपरी-चिंचवड: आळंदी येथील एका धर्मशाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला तिच्या खोलीत तीन दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार हराळे धर्मशाळा येथे घडला आहे.
पीडित वृद्ध महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि 25 मार्च) ला फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना आरोपींनी 1 ते 4 जुलै या तीन दिवसाच्या कालावधीत धर्मशाळेतील त्यांच्याच खोलीला व गेटला कुलूप लावून डांबून ठेवले होते. याप्रकरणाचा तपास फौजदार गिरीगोसावी करीत आहेत.