इंदापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे आठवडे बाजारात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पत्रके वाटण्यात आली. तत्पूर्वी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
यावेळी बोलताना शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख सीमा कल्याणकर म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना पुणे जिल्हा महिला, मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्ष यांच्यावतीने बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज शहरात आठवडे बाजारात नागरिकांना पत्रके वाटण्यात आली. ” रामकृष्ण हरी ताई पेक्षा वहिनीच भारी” असा नारा देत सुनेत्रा पवार यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले, असल्याचे सीमा कल्याणकर यांनी सांगितले.
शिवसेना पक्षाच्या वतीने भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही तळागाळात जावून काम करु, असे शिवसेना इंदापूर तालुका अध्यक्ष रामचंद्र जामदार यांनी सांगितले. यावेळी रुपाली रासकर, राधिका जगताप, ज्योती शिंदे, सोनम खरात, वैभव यादव, प्रशांत निरवे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.