पुणे : मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचे ‘अटल’ सेतूवरुन प्रवासाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. एसटी महामंडळाकडून प्रायोगिक तत्त्वावर “अटल सेतू “वरून उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून शिवनेरी बस सुरू करण्यात आली आहे. पुणे स्टेशन-मंत्रालय(सकाळी ६.३०) व स्वारगेट- दादर (सकाळी ७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत.
या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. त्यानंतर परतीचा प्रवास सकाळी 11 व दुपारी 1 वाजता याचमार्गे मंत्रालय व दादर येथून निघतील.
यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे 1 तास वाचणार आहे. त्याशिवाय, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एसटी महामंडळाने तिकट. त्यासंदर्भातही एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा दिला आहे. मुंबई-पुणे या मार्गावरील तिकीट दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
तसेच शिवनेरी बस मुंबईतून सुटताना त्यामधून 45 प्रवाशांची संख्या आवश्यक असल्याची अट आधी घालण्यात आली होती. आता २ शिवनेरी बसेस अटल सेतूवरून धावणार आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासाच्या वेळेत देखील बचत होणार आहे. दादर-शिवडी-अटल सेतू-उलवे-पनवेल-पुणे असा या शिवनेरी बसचा मार्ग असणार आहे.