विशाल कदम
Mount Everest | लोणी काळभोर : पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni Kalbhor) येथील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे (PSI Shivaji Nanvare) यांनी आज गुरुवारी (ता.१८) माऊंट एवरेस्ट शिखर सर करून पराक्रम करून दाखविला आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे पुणे ग्रामिण पोलीस दलाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (PSI Shivaji Nanvare reached the summit of Mount Everest)
माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्राची रणरागिणी सुविधा राजेंद्र कडलग यांची एवरेस्ट मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांची निवड करण्यात आली होती.(Loni Kalbhor)
पुणे ग्रामिण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा…
माउंट एव्हरेस्ट शिखर हे चढाईस अत्यंत कठीण असे पर्वतशिखर आहे. पण हार मानलं तो माणुस कसला, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या सहाय्याने शिवाजी ननवरे यांनी आज गुरुवारी (ता.१८) माऊंट एवरेस्ट शिखरावर तिरंगा झेंडा रोवला.
याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे म्हणाले की, ‘गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य करत असताना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. ती आवड कर्तव्य बजावीत असताना व्यस्त वेळापत्रकातून कायम ठेवली आहे. (Loni Kalbhor) माऊंट एवरेस्ट सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता असणे अत्यावश्यक आहे. उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे नॉर्मल चालताना देखील दमछाक होते. परंतु, जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स नेहमी यशस्वी होतात.’
माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. (Loni Kalbhor) हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८, ८४८.८६ मीटर इतकी असून ते नेपाळ व चीन ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेटमध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.
दरम्यान,या मोहिमेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे ,श्रीनाथ बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ व उद्योजक पंडित झेंडे यांनी या मोहिमेसाठी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना मोठी मदत केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :