पुणे : पिंपरी- चिंचवड येथील भोसरीमध्ये आज महायुतीची जाहीर सभा पार पडली. भोसरीमध्ये आढळराव पाटील यांच्यासाठी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाजी आढळराव पाटील, महेश लांडगे यांच्यासह इतर अनेक महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हेच महागद्दार आहेत, अशी टीका केली आहे.
काय म्हणाले शिवाजी आढळराव पाटील?
शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मतदारांनी गेल्या पंचवार्षिकला दिल्लीत पाठवलं. कोल्हे पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघात दिसले नाहीत. मी पराभूत होऊन देखील पाच वर्षांपासून मतदारसंघात फिरत आहे. विकास कामे करत आहे. असं आढळराव पाटील यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, अमोल कोल्हे यांना पंधरा ते वीस गावाच्या वेशीवर अडवलं. त्यांना नागरिकांनी जाब विचारला. तुम्ही आमच्यासाठी काय केलं. अशी विचारणा केली. मतदारांनी कोल्हे यांना फोन केल्यानंतर त्यांचे पीए हे अमोल कोल्हे यांच्या आवाजात बोलतात. अमोल कोल्हे यांनी आत्तापर्यंत पाच पक्ष बदलले आहेत. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार आणि शरद पवार गट अशा बेडूक उद्या त्यांनी घेतल्या आहेत. कोल्हे हेच खरे महागद्दार आहेत. अशी टीका शिवाजी आढळराव पाटील यांनी केली आहे.