युनूस तांबोळी
शिरूर : मर्द मराठ मावळ्यांच्या लढवय्या व बलवान सामर्थ्यातून स्वराज्य निर्माण करण्याचे बळ छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले.
असे रयतेच्या कल्याणकारी राज्याची शिकवण तरूणांनी घेतली पाहिजे. असे मत माजी प्राचार्य प्रभाकर खोमणे यांनी व्याक्त केले.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणजीत गावडे होते. यावेळी प्राचार्य आर. बी. गावडे,अध्यक्ष बन्शीशेठ घोडे, दत्तात्रेय कांदळकर, संदिप गावडे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, विद्यालयात शिवप्रतिमापूजन करण्यात आले.या प्रसंगी छत्रपती शिवाजीमहाराज, राजमाता जिजाऊ आणि काही मावळे त्यांची वेशभुषा करून गावातून मिरवणुक काढली होती.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे शिवज्योत चे स्वागत माजी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
गावातून सवाद्य शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी माजी अधिकारी प्रभाकर गावडे, माजी सरपंच दामुशेठ घोडे, सावित्रा थोरात, पारभाऊ गावडे व मोठ्या प्रमाणात तरूण
उपस्थित होते.