युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस लांबणीवर जातो. त्यावेळी फक्त नजर आभाळाकडे आणी होणाऱ्या पावसाकडे असते. पुरेपूर पाऊस झाला नाही की मग धरणाच्या पाणीसाठ्याचा आधार मिळतो. त्यातून संबधीत विभागाकडून दिले जाणारे आवर्तन महत्वाचे ठरते. जलाशय, बंधारे, कालवा अन पोटचाऱ्या मार्फत वेळेत दिले जाणारे पाण्याचे आवर्तन पिण्यासाठी व शेतीसाठी उपयुक्त ठरते. वर्षानूवर्षे हे पाणि नवसंजीवनी ठरत असल्याने पाणी मिळण्या बरोबर मागणीसाठी पाण्याचा भडका होऊ लागला आहे.
हे होत असताना वर्षानूवर्ष पाणी व्यवस्थापनेची यंत्रणा… धरण, बंधारे, कालवा अन पोटचाऱ्यांची डागडूजी होणे महत्वाचे आहे. ही सर्व मालमत्ता सार्वजनीक असली तरीही ती आपल्याच मालकीची आहे. हे सगळेच विसरून गेले आहेत. पाणी यंत्रणेच्या संगोपनाची, डागडूजीची, सुरक्षीततेची जबाबदारी कोणाची? असा सवाल उभा राहिलेला पहावयास मिळत आहे. संबधीत खाते, अधिकारी आपली जबाबदारी झटकू देऊ लागल्याने या यंत्रणेची सुरक्षा कशी करावयाची असा प्रश्न उभा राहिला आहे.
जलाशय,धरण, बंधारे, कालवा अन पोटचाऱ्यांच्या डागडुजीची गरज
जलाशय अथवा धरण : पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी अडवून त्याचे मोठ्या जलाशयात रूपांतर करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात पिण्यासाठी व शेतीसाठी या धरधेबांधण्यात आली आहेत. या धरणाच्या पाणी साठ्यातून शेती व्यवसाय फुलविण्याचे काम होऊ लागले आहे. अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्यात तयार केलेली धरणे या परीसरातील लोकांसाठी नवसंजीवनी ठरली आहेत. पण या धरणाच्या डागडूजी अथवा गळती कमी करण्यासाठी उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. (Shirur News) भिंतीला तडे जाणे, गळणे अथवा या ठिकाणी लहान लहान रोपटे उगवणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतात. पावसाळा सुरू झाला तरी धरणांच्या डागडूजीची कामे होत नाहित. भविष्यात धरणाला मोठा तडा गेल्यास याला जबाबदार कोण ? असा सवाल देखील पुढे येऊ लागला आहे.
पावसाळ्यात जलाशयात अथवा धरणात पाणी साठा होण्या अगोदर धरणांची डागडूजी अथवा पाहणी अथवा सुरक्षीततेच्या उपाययोजना होणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात डिंभा धरणातून बोगदा करून पाणी दुसऱ्या धरणात नेण्यात येणार आहे. धरणात नव्याने बोगदा करून गावांना हे पाणी मिळावे यासाठी निवेदन, आंदोलन, मोर्चा करून या पाण्याचा भडका होणार आहे.
पावसाचे प्रमाण व या धरणांची पाणी साठ्याची मर्यादा (Shirur News) या सर्व गोष्टींचा विचार करून या धरणाच्या सुरक्षीततेबाबत उपाय योजना केली पाहिजे. पाणी पाहिजे पण धरणांची डागडूजी, सुरक्षा नको याकडे सर्वांचे लक्ष लागलेले पहावयास मिळते. नेते मंडळी पाण्याच्या मागणीसाठी आपसा आपसात भांडणार आहेत. पण धरणांच्या सुरक्षीततेसाठी काय करणार असा सवाल देखील पुढे येऊ लागला आहे.
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे : धरणात साठवलेले पाणी नदी मधून सोडून ते शेती व पिण्यासाठी उपयुक्त ठरावे. यासाठी नद्यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहे. पुणे जिल्हातील बहुतेक नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहे. या बंधाऱ्यात १५ आक्टोबर ढापे टाकून पाणी अडविण्याचे काम केले जाते. मे च्या शेवटच्या आठवड्यात हे सर्व ढापे काढून घेऊन पाणी सोडून दिले जाते.
या काळात नद्या कोरड्या झाल्यावर बंधाऱ्याच्या भिंतीची डागडूजीची कामे होणे गरजेचे आहे. त्यानंतर ढाप्यांना कलर लावून ते सुरक्षीत स्थळी ठेवले पाहिजे.कुकडी व घोडनदीवर ढाप्यांना कलर देण्याचे काम केले जात नाही. त्यातून गंज लागणे, ढापे सडण्याचे प्रकार घडतात. त्यातून मोठी गळती होते. बंधाऱ्याच्या पाया लगतचा भागात पडणारे खड्डे तसेच भिंतीतून होणारे गळती थांबवली पाहिजे. पण ही कामे होतच नाहीत. ढापे सुरक्षीत स्थळी न ठेवणे त्यातून ढापे चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहे.
वडनेर येथील कुकडी नदीवर ढापे चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. हे नुकसान मुळतः सार्वजनीक असले तरी ही मालमत्ता आपलीच आहे. याचा सर्व खर्च शासन व पाणी पट्टी वसुलीतून केला जातो. म्हणजे ही मालमत्ता आपलीच आहे. काही बंधाऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात ढापे चोरीला गेले आहे. (Shirur News) ढापेची सुरक्षा नाही याबाबत अधिकारी जबाबदारी झटकून देतात. त्यामुळे वर्षानुवर्ष ढापे चोरणारी ढोळी आक्रमक झाली आहे.
या बंधाऱ्यातून उपसा करून शेतीला पाणी दिले जाते. मग याची जबाबदारी कोणी घ्यायची. बंधाऱ्याची भिंत कोसळून पाणी वाया गेल्याची घटना या मागिल काळात घडली आहे. या बंधाऱ्यावरील सुरक्षीत कडठे तोडून नेण्याचे प्रकार घडत आहेत. आधंळ दळतय अन कुत्र पिठ खातय… असाच काहिसा प्रकार या बंधाऱ्याबाबत होऊ लागला आहे.
कालवा अन पोटचाऱ्या :
शेतीला थेट पाणी पुरवठा करण्यासाठी कालवा व पोटचाऱ्या तयार करण्यात आल्या. यासाठी कोट्यावधी निधी शासनाने खर्च केला आहे. कालवा त्यातून सुटणाऱ्या पाण्याची गळती होऊ नये. यासाठी अस्थरिकरण करण्यात आले. त्यामुळे वेगाने व लवकर हेट टू टेल पाणी देण्याचे काम होत आहे. या कालव्यामधून मोठ्या दगड व इतर कचरा वाहून येत असतो. त्याचा अडथळा अनेकवेळा होतो. काही ठिकाणी झाडे उगवली असतात. त्या बरोबर कालव्या लगत देखील झाडे उगवतात. त्यामुळे याची देखभाल होणे महत्वाचे आहे. संबधीत खात्याने यातील कचरा काही काळानंतर काढणे गरजेचे आहे. यासाठी निधी मंजूर होत असतो. पण देखभाली साठी काम होत नसल्याचे दिसून येते. पाणी थेट मिळत असल्याने या पाण्याची पळवापळवी होत असते. काही ठिकाणी कालव्या फुटल्याच्या घटना घडतात.
कालव्याचे पाणी रस्त्यावर सोडून दिले जाते. मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. मग याकडे कोणी लक्ष द्यायचे. पोटचाऱ्या बाबत तर विलक्षण प्रकार दिसून येत आहे. खरे तर पोटचाऱ्यांमार्फत पाणी शेतीला देण्याचे काम व्हावे. यासाठी या पोटचाऱ्यांची निर्मीती केली. मात्र बहुतेक ठिकाणी पोटचाऱ्या गायब झाल्या आहेत. संबधीत खात्याने तयार करून घेतलेल्या या पोटचाऱ्या कुठे गायब झाल्या आहेत. हे पाहिले पाहिजे. शासनाचा पोटचाऱ्यावरील खर्य वाया गेला की काय? याची शहानिशा करावी. पोटचाऱ्या गायब करणाऱ्या विरोधात कारवाई करावी. (Shirur News) या पोटचाऱ्यांमार्फत शेतकऱ्याला पाणी मोजून दिल्यावर पाण्याची किंमत कळून येईल.
ही सर्व यंत्रणा सार्वजनीक असली तरी ती आपल्याच मालकिची आहे. ‘पाणी हे जीवन आहे’. ‘पाणी संभाळून वापरा’. हे सांगताना ‘पाणी यंत्रणे ची सुरक्षा करा’ अशाही सुचना पाटबंधारे विभागाने जागोजागी फलक लावणे गरजेच्या ठरू लागल्या आहेत. पाणी मिळण्याबरोबर पाण्याची सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची ठरू पहात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पाल्यांच्या योगा व प्राणायम साठी पालकांनी वेळ द्या – राजेंद्र गावडे
Shirur News : शिरूर येथील घोडनदी पात्र कोरडे , विजेच्या शॅाक मुळे माशांची नैसर्गीक पैदास थांबली