Shirur News : पुणे : भारतीय संस्कृतीमध्ये गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशोत्सव हा फक्त जल्लोष करण्याचा सण नसून, सामाजिक उपक्रम राबवून तो साजरा केला जातो. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावागावांत अनेक उपक्रमशील मंडळे तयार झाली आहेत. या मंडळांकडून उल्लेखनीय काम होत आहे, अशआ शब्दांत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी श्री गणेश मंडळांच्या कार्याचे कौतूक केले.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये मंडळाच्या श्री गणरायांचे दर्शन घेण्यासाठी पूर्वा वळसे पाटील आल्या होत्या. (Shirur News) त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम इचके, माजी सरपंच दीपक रत्नपारखी, बाजीराव उघडे, बाळासाहेब डांगे, भरत भोर, जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेश सांडभोर, आंबेगाव महिला राष्ट्रवादीचे अध्यक्षा राजश्री शिंदे, यशस्विनीच्या स्वाती निघोट, माजी सरपंच प्रमोद वळसे पाटील, सरपंच बिपीन थिटे, मिट्टूशेठ बाफना, डॅा. विकास शेटे, दत्ता घोडे, अशोक गाडेबैल, संदीप गायकवाड, फक्कड जोशी, किशोर शेटे, महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. कवठे येमाई येथे नवज्योत तरूण मंडळ, फ्रेंडशिप तरूण मंडळाच्या आरतीचा मान त्यांना देण्यात आला. जांबूत येथे देखील त्यांनी श्री गणेश मंडळांना भेट दिली.
बाफना फेसबूक फ्रेंड…
कवठे येमाई येथील मिट्टूशेठ बाफना हे राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते असून, ते लहानपणापासून माझे फेसबूक फ्रेंड आहेत. आज त्यांना प्रत्येक्षात भेटताना आनंद झाल्याचे पूर्वा वळसे पाटील यांनी सांगितले. (Shirur News) या वेळी सगळ्यांनीच टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
आंतरराष्ट्रीय निवडणुकीला सामोरे जाणार…
भविष्यात निवडणूकीला सामोरे जाणार का? असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या की, असा प्रश्न अजून का विचारला गेला नाही, याचाच विचार मी करत होते. (Shirur News) मी आंतरराष्ट्रीय निवडणुकीला सामोरे जाणार, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले. त्यावर चांगलाच हशा पिकला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : माळवाडीच्या उपसरपंचपदी आदिनाथ भाकरे बिनविरोध
Shirur News : कवठे येमाई येथील ओढ्यात पाय घसरून तरूण वाहून गेला