…तर कब्रस्तान भुमीपूजन रखडले..
Shirur News :शिरूर: राज्याच्या राजकारणात सत्तेच्या माध्यमातून विकासकामे करत असताना सर्व समाजाच्या समस्या सोडवताना त्यांना न्याय मिळवून दिला आहे. ऊर्जामंत्री असताना कोट्यवधी रूपयांची कामे करत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले. मात्र, कुठेही नारळ फोडून मिरविण्याचे काम केले नाही. कामाच्या श्रेयाबाबत प्रत्येक गावात लोकप्रतिनिधींनी दोन पाऊले मागे घेतली पाहिजे. त्यातून एकसंघता निर्माण होऊन एकोपा निर्माण झाल्यास सामान्य माणसाची ससेहोलपट होणार नाही. सर्वसामान्य माणूस विकासकामात आनंदात सहभागी झाल्यावर विकासकामांची गती वाढणार आहे, असे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
कवठे येमाई येथे विविध विकासकामांची भूमिपूजने
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील विविध विकासकामांच्या भुमीपूजन समारंभानिमित्त ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, (Shirur News) पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच सुनिता पोकळे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुदाम इचके, योगेश थोरात, माजी सरपंच बबनराव पोकळे, उत्तम जाधव, हौशीराम मुखेकर, दिपक रत्नपारखी, बाजीराव उघडे, राजेंद्र सांडभोर, भरत भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास इचके यांनी केले. तर मिट्टूशेठ बाफना यांनी आभार मानले.
वळसे पाटील म्हणाले की, ”राज्यात बेराजगारी, महागाई, दुष्काळ त्यातून उत्पन्नाचे साधन नाही. मुलींना देखील शेतकरी नवरा नको आहे. त्यामुळे मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाही. हे सर्व सामाजिक प्रश्न भेडसावत आहेत. त्यातून समाजाच्या विकासाचे अनेक समस्या व प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविणे गरजेचे आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असून, पालकमंत्री असताना पुणे, अहमदनगर असा कोणताच भेदभाव न करता समान पाणि वाटपाचे काम केले. (Shirur News) भविष्यात देखील विकासकामे करत असताना सर्व समाजातील नागरिकांना एकत्रित घेऊन काम करावे लागणार आहे”.
जागेअभावी कब्रस्तानचा प्रश्न सोडवण्यास अडचण
कवठे येमाई (ता.शिरूर) येथे मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान तयार करून मुस्लीम समाजाचा दफनविधीचा प्रश्न सोडविणार होतो. दफनभूमी तयार करण्यासाठी तीनवेळा निधी टाकण्यात आला. मात्र, स्थानिक जागेचा प्रश्न निर्माण होऊन ग्रामस्थांनी जागेचा प्रश्न सोडविला नसल्याने दफनभूमी उभी करण्यात अडचणी निर्माण होत आहे. (Shirur News) भविष्यात ग्रामस्थांनी हा जागेचा प्रश्न सोडवून या मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित राहण्याची गरज असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पारंपारीक वेशभूषा व हरिनामाच्या गजराने मुर्तीची सवाद्य मिरवणूक
Shirur News : महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये अनोखे रक्षाबंधन
Shirur News : गहाळ झालेले मोबाईल शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधन सणाच्या दिवशी नागरिकांना परत