युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : चासकमान धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडावे. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. शेतकऱ्यांचा या मागणीचा वळसे पाटील यांनी नेहमी पाठपुरावा केला. आणि आज अखेर या पाठपुराव्याला यश आले असून चासकमान धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला
खेड (जि.पुणे) तालुक्यातील चासकमान धरण ५० टक्केपेक्षा जास्त क्षमतेने भरले आहे. जुलै महिना सुरू असूनही शिरूर तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. (Shirur News ) पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांचा चा-यासाठी पाणी टंचाई निर्माण झाली होती.
त्यामुळे केंदूर, करंदी, पिंपळे खालसा, जातेगाव बु., जातेगाव खु., गणेगाव, पिंपरी दुमाला, खंडाळे, रांजणगाव, बुरुंजवाडी, वाघाळे, वरुडे या भागातील शेतकऱ्यांनी चासकमान डाव्या कालव्याला पाणी सोडावे. (Shirur News ) अशी मागणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.
शेतकऱ्यांची अडचण समजून घेऊन दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चासकमान धरणातून डावा कालव्यामधून पिण्याच्या पाण्यासाठी आर्वतन सोडण्याची मागणी केली होती. (Shirur News ) या मागणीची देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दाखल घेऊन पाणी सोडण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला दिले होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देलेल्या आदेशाची त्वरित दखल घेतली आणि. प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी करून चासकमान धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडले आहे.
चासकमान धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आभार मानले. (Shirur News ) असे राष्ट्रवादीचे आंबेगाव शिरुर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा – कृषी सहाय्यक जयवंत भगत